बाबुराव कुलकर्णी यांनी आपल्या समर्थकांसह दाखल केला उमेदवारी अर्ज

Foto
 औरंगाबाद: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री अनिल पटेल, शहर व जिल्हा अध्यक्ष नामदेवराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल, किसान सेलचे विलास औताडे,  अशोक सायन्ना, किरण डोणगावकर, जगन्नाथ काळे, भीमराव डोंगरे आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. आज सकाळी अकराच्या सुमारास शहागंज येथील गांधी भवनात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. मान्यवरांच्या हस्ते शहागंज येथील गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर लेबर कॉलनीतील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रमुख पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत उमेदवार बाबुराव कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker